Rohit Pawar: लातूरच्या तरुणांचा रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा; प्रकृतीची काळजी व्यक्त करत सुपूर्द केले भावनिक पत्र
Rohit Pawar :

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणीचा आग्रह धरत रोहित पवार यांनी शुक्रवारी 12 जून पासून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावली आहे. त्यांची साखरेची पातळी कमी झाली आहे. परंतु तरीही रोहित पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कर्जमाफीच्या जाचक अटी जोपर्यंत सरकार हटवत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतला आहे.
दुसरीकडे, रोहित पवार यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक नेतेमंडळींसह नागरिक रोहित पवारांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल होत आहेत.
याच दरम्यान, लातूरच्या औसा येथील युवक सूरज ढवण व प्रशांत दळवे यांनी सहकुटुंब रोहित पवार यांची अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी युवकांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवत त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करणारे भावनिक पत्र सुपूर्द केले.
तसेच संघर्षयात्रेच्या काळात जसे रोहित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तसेच शेतकऱ्यांना न्याय आणि सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत या संघर्षातही सोबत राहणार असल्याची भावनाही युवकांनी व्यक्त केली.
त्यांच्या या निवदेनाची प्रत रोहित पवारांनी शेअर करत ‘प्रार्थना करणारे इतके हात असतील आणि पाठीशी खुद्द पंढरीचा विठुराया असेल तर काळजी कशाची करायची…?’ असे म्हणत आभार व्यक्त केले. Rohit Pawar
दरम्यान, रोहित पवार यांच्या मुख्य मागण्यांना अद्याप शासनाने संमती दिलेली नाही. त्यामुळे सध्या सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Rohit Pawar
हेही वाचा:






