Karad Congress Protest : भाजपविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर; कराडामध्ये जोरदार घोषणाबाजी
Karad Congress Protest : युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांची अटक आणि प्रवक्ते हनमंत पवार यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कराडमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले.

Karad Congress Protest : युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना झालेली बेकायदेशीर अटक तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनमंत पवार यांना पुणे येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी कराड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
जिल्हा युवक काँग्रेस, कराड तालुका काँग्रेस कमिटी आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या दडपशाही व लोकशाहीविरोधी धोरणांचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, कराड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष वैशाली जाधव, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, पंचायत समिती सदस्य रवी बडेकर, युवक काँग्रेस सरचिटणीस अक्षय सुर्वे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

