मोशीत आर्थिक व्यवहारातून तरुणाची निर्घणपणे हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद, पाच जणांवर गुन्हा दाखल
Updated On:

Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात एका तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, खून झालेल्या तरुणाचे नाव ज्ञानेश्वर बर्गे असे आहे. आर्थिक व्यवहारातून तरुणावर वार करण्यात आल्याची माहिती आहे. ही घटना शनिवारी १७ मे पहाटे मोशी येथील एका हॅाटेलसमोर तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशोक म्हाळसकर, रोहन म्हाळसकर, प्रसाद म्हाळसकर, अमोल निळे आणि संकेत जैद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मोशीत तरुणावर सपासप वार करून करण्यात आलेल्या निर्घूण हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.





