Pune Crime News : कोथरूड परिसरात एका २५ वर्षीय तरुणावर दोन अज्ञात इसमांनी धारदार हत्याराने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pune Crime News) मिळालेल्या माहितीनुसार, साहिल दशरथ कांबळे (२५, रा. श्रावणधारा, कोथरूड) हा गोपीनाथ नगर, कोथरूड येथे उभा असताना दोन इसम त्याच्याजवळ आले. त्यानंतर त्यांनी कोणत्यातरी धारदार हत्याराने साहिलच्या डोक्यावर व हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. (Pune Crime News) घटनेनंतर स्थानिकांनी साहिल याला तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल, कोथरूड येथे दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले. (Pune Crime News) प्राथमिक तपासात जखमी साहिल आणि आरोपींमध्ये दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाल्याचे समोर आले आहे. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात १७ मे रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News) पोलीसांना संशयित दोन इसमांचे मोबाईल क्रमांक मिळाले असून त्यापैकी एका आरोपीचा मोबाईल गुरुवार पेठ परिसरात बंद झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस त्यांच्या मित्रांकडे चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे. (Pune Crime News)