‘अजून तुला स्टार व्हायचंय..’ ‘या’ कारणामुळे आर्यन खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर VIDEO

मुंबई – शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ प्रकरणानंतर देखील चांगलाच चर्चेत असतो. कधी तो बॉलिवूड पार्टीमध्ये दिसतो तर कधी सोशल मीडियावर व्हायरल होतो. तर कधी मीडियाला अटेंशन दिल्यामुळे व्हायरल होतो. सध्या आर्यनचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यावरून नेटकऱ्यांनी देखील त्याला ट्रोल करत सुनावले आहे.
यापूर्वी उद्योगपती अंबानी यांच्या कार्यक्रमात आईसोबत मीडियाला अटेंशन दिल्यानंतर तो ट्रोल झाला होता. आता देखील तसेच काहीसे घडले आहे. आर्यनचा वाट पाहत पापाराजी थांबले होते. इतक्यात तो आला आणि थेट गाडीत बसून निघून गेला. ‘प्यार विथ डीजे मोहब्बत’ च्या स्क्रिनिंगनंतर हा प्रकार घडला. यामुळे थांबलेले पापाराजी चांगलेच नाराज झाले.
View this post on Instagram
आर्यन खानने यावेळी कोणतेही अटेंशन न दिल्याने मीडिया कर्मी चांगलेच संतप्त झाले. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ‘अजून तुला स्टार व्हायचंय’ अशी कमेंट एका युजरने करत त्याला सुनावले आहे. तर दुसऱ्याने ‘तुझ्या वडिलांकडून काहीतरी शिक’ असा सल्ला दिला आहे.





