“तुझं आयुष्य खराब केलंस”; दीपिका कक्कर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Dipika Kakar Trolled | टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा पती शोएबसोबत, तर कधी मुलगा रूहानसोबत ती फोटो शेअर करते. नुकतेच दीपिकाने पारंपरिक लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामुळे ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
दीपिका कक्करने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. त्यावर लाल रंगाची लेस आहे. हे फोटो शेअर करत, ‘शालीन राहा, मजबूत राहा. नेहमी स्वतःच्या मूळ स्वरूपात राहा…”असे लिहिले आहे. Dipika Kakar Trolled |
View this post on Instagram
दीपिकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला, पण काही युजर्सनी तिला लूकवरून ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले, ‘मान्य कर किंवा नका, तू तुझं आयुष्य खराब केलं.” याशिवाय, आणखी एकाने लिहिले, ‘बहीण, एक स्टायलिस्ट हायर कर ठेव, तू अफोर्डही करू शकतेस.’ तर काही जणांनी तिच्या लुकचे कौतुकही केले आहे. Dipika Kakar Trolled |
दरम्यान, दीपिका कक्करने टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमशी दुसरे लग्न केले. ज्यानंतर तिला प्रचंड ट्रोलही करण्यात आले होते. आज हे जोडपे एका मुलाचे पालक आहेत आणि आपल्या आयुष्यात आनंदी आहेत. मुलाच्या जन्मानंतर दीपिकाने अभिनयापासून अंतर राखले आहे. Dipika Kakar Trolled |
हेही वाचा :
मराठवाड्यात अवकाळीचे थैमान; ३ शेतकऱ्यांचा मृत्यू, कांद्यासह फळपिकांना मोठा फटका





