“इतिहास माहिती असावा लागतो, सहज बोलून…”; गुणरत्न सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर

Gunaratna Sadavarte | महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी केलेल्या विधानामुळे खासदार उदयनराजे भोसले चर्चेत आले आहेत. स्त्री शिक्षणाच्या इतिहासाबद्दल बोलताना त्यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केल्याचं म्हटलं होतं. यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजेंना प्रत्युत्तर दिले आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “इतिहासाचा दाखला देताना अभ्यास करावा लागतो. त्यासाठी संदर्भग्रंथ वाचावे लागतात. सहजच बोलून चालत नाही. त्यासाठी इतिहास माहिती असावा लागतो. महात्मा जोतिबा फुले यांचा अभ्यास जगभरात अनेक देशांमध्ये, अनेक विद्यापीठांत शिकवला जातो. अनुकरण या शब्दाचा अर्थ, संदर्भ त्यांना माहितीय का? तुम्ही समोर येऊन नीट समजावून सांगा. नाहीतर माफी मागितली पाहिजे.” Gunaratna Sadavarte |
मनसेच्या मराठीच्या भूमिकेवरही गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली. सदावर्ते म्हणाले की, “संविधानाची भाषा हिंदी आहे. मनसेनं महाराष्ट्रातील ४८ खासदारांचा धिक्कार करणं म्हणजे वैचारिक विकार असणं आहे. जे खासदार मनसेसाठी उभा राहिले नाहीत त्यांनी संविधानाचा विचार केला असेल. जे संविधानाच्या विरोधात होते त्यांना लाथाडलं. किती नेत्यांची मुलं इंग्रजी शाळांमध्ये शिकतायत? हिंदी भाषेत जे बोलतात ते संविधानाचीच भाषा बोलतात. त्यामुळे त्यांना कुणीही थांबवू शकत नाही,” असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. Gunaratna Sadavarte |
काय म्हणाले होते उदयनराजे भोसले ?
”स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. ती देखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं. थोरले प्रतापसिंह महाराज यांचे महात्मा फुलेंनी अनुकरण केलं”, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं होतं. Gunaratna Sadavarte |
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध कायदा केला पाहिजे, अशी परखड भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली. परंतु त्यांच्या या विधानानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत.
हेही वाचा:
“मनसे ही भाजपची बी टीम”; आदित्य ठाकरेंचा पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा





