Gaurav More: “आपले पाय आमच्या वास्तूला लागले…”; गौरव मोरेच्या घरी पोहचला बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेता
Gaurav More: गौरवने अत्यंत आदराने त्यांचा पाहुणचार केला.

Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे अभिनेता गौरव मोरेला मोठी लोकप्रियता मिळाली. अलिकडेच त्याने मुंबईत नवं घर घेतले आहे. यानिमित्त अनेक कलाकारांनी त्याच्या घराला भेट दिली. यानंतर आता गौरव मोरेच्या घरी बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते जॉनी लिव्हर देखील पोहचले. गौरवने अत्यंत आदराने आणि नम्रपणे त्यांचा पाहुणचार केला.
गौरवने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत जॉनी लिव्हर गौरवच्या घरी आलेले दिसतात. गौरव, त्याची पत्नी आणि संपूर्ण कुटुंब प्रेमाने जॉनी लिव्हर यांचा पाहुणचार करतं. यावेळी गौरव आदराने जमिनीवर बसून त्यांच्याशी गप्पा मारतो. (Gaurav More)
View this post on Instagram
पुढे जॉनी गौरवच्या बाल्कनीत जाऊन इमारत बघतात. त्यानंतर गौरव आणि त्याचं कुटुंब जॉनी यांच्या पाया पडून आशीर्वाद देतात. गौरवची आई जॉनी यांना शाल देऊन त्यांचं स्वागत करतात. गौरवच्या नवीन घरासाठी जॉनी यांनी खास भेटवस्तूही आणलेली दिसते. (Gaurav More)
गौरवने हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, ”प्रिय जॉनी लिव्हर सर, आज आपले पाय आमच्या वास्तूला लागले आणि आम्ही धन्य झालो. आम्हीच काय माझ संपूर्ण घर, येणारी पिढी, मागची पिढी सगळेच सुखावलो. तुमचा सिनेमा पाहता यावा म्हणून केलेली धडपड कधी दारात उभ राहून, तर कधी खिडकीत उभ राहून, आपले सिनेमे बघितले आहेत. आपण आमच्यासारख्या मुलांसाठी एक उर्जा आहात, आमचे गुरु आहात. खूप खूप प्रेम सर जॉनी लिव्हर सर. असाच आशीर्वाद असू दे आमच्यावर.” असे म्हणत गौरवने त्याच्या भावना शेअर केल्या आहेत. (Gaurav More)
हेही वाचा:





