Amit Shah: “तुम्ही पाप केलंय, जनता तुम्हाला माफ करणार नाही…” ; वंदे मातरम वादावरून अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी चित्तोरगड याठिकाणी वंदे मातरम वादावरून काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी चित्तोरगड याठिकाणी वंदे मातरम वादावरून काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. अमित शाह यांनी यावेळी, स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम गायले जात होते आणि सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ते थांबवण्यास सांगितले.
अमित शाह म्हणाले, “हे आपण सर्वांनी टीव्हीवर पाहिले. ८० वर्षांनंतर, जेव्हा बंकिम बाबूंच्या या अमर गीताचा पुन्हा सन्मान केला जात आहे, तेव्हा सोनिया गांधींना ते आवडलेले नाही. सोनिया गांधी, १.४ अब्ज लोक तुम्हाला पाहत आहेत. या देशातील जनता तुम्ही केलेले हे पाप कधीही माफ करणार नाही.”
केंद्रीय गृहमंत्री यांनी प्रश्न विचारला की, वंदे मातरम गायन अपूर्ण सोडण्याचे स्वप्न तरी कोणी कसे पाहू शकते. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शाह म्हणाले की, काँग्रेस नेत्यांना या घटनेची लाज वाटली पाहिजे आणि त्यांच्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर त्यांनी हात जोडून बंकिम बाबूंच्या अमर आत्म्याची आणि देशातील जनतेची माफी मागावी.
#WATCH | Chittorgarh, Rajasthan | Union Home Minister Amit Shah says, “Look at their (Congress’s) shamelessness. The anthem Vande Mataram was being sung at the Congress Party headquarters. During the anthem, Congress leader Sonia Gandhi told the Congress President to stop… pic.twitter.com/HSbiWGf1La
— ANI (@ANI) August 16, 2026
अमित शाह यांनी आरोप केलाय, व्होट बँकेच्या लालसेपोटी काँग्रेस पक्ष ‘वंदे मातरम’ विसरला आहे. यापूर्वी, शाह यांनी निंबाहेरा येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यांनी राजस्थान सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. याप्रसंगी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हेही उपस्थित होते.
काँग्रेस मुख्यालयात काय घडले? Amit Shah:
दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भाजपने आरोप केला आहे की, सोहळ्यादरम्यान ‘वंदे मातरम’चे सर्व सहा कडवे गाण्यास काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आक्षेप घेतला होता, तर काँग्रेसने हा आरोप फेटाळला आहे. यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.
अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर ‘वंदे मातरम’वरील राजकीय चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. भाजप हा मुद्दा राष्ट्रवादाशी जोडून काँग्रेसवरील हल्ला अधिक तीव्र करेल, असे मानले जात आहे.
सोनिया गांधींनी खर्गे यांच्यासाठी खुर्ची मागितली होती Amit Shah:
काँग्रेसने भाजपचे आरोप फेटाळून लावले असून, वंदे मातरम गायन थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचे म्हटले आहे. पक्षाचे खासदार आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले होते की, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बराच वेळ उभे असल्याने सोनिया गांधी केवळ त्यांच्यासाठी खुर्ची आणायला सांगत होत्या.





