Taarak Mehta Ka Ooltah Chashmah – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र अनेक कलाकरांनी या मालिकेला रामराम केला. मुख्य भूमिकेत असणाऱ्या दयाबेन (Dayaben) अर्थात दिशा वकानीने (Disha Vakani) 2017 मध्ये प्रसूती रजा घेतली होती. तेव्हापासून ती शोमध्ये परतली नाही.
अनेकांनी तिला मालिकेत पुन्हा परतण्याची मागणी केली. परंतु अद्याप तिचे मालिकेत पुनरागमन झाले नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेतल्यानंतर ती पुन्हा मालिकेत परतेल अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, यावेळी देखील चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही.
नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये जेठालाल दयाच्या येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी सोसायटीच्या आवारात तासनतास तिची वाट पाहत असतो तर दुसरीकडे आई परतणार म्हणुन टप्पू देखील फटाके फोडतो. दयाबेनच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण गोकुळधाम जल्लोष करताना दिसला.
This show is ruined by makers. They deceit us every time on poptlal marriage and daya bhabhi’s comeback. They play with our emotions🥺. They just want money and TRP. Ab inko dikhana padega ye viewers ke support ke bina kuch nahi.
Sad for jhetha bhai💔@sabtv #BoycottTMKOC pic.twitter.com/o2YGkG9Hh9— ᏗᏰᏂᎥ (@nomad_abhi6) December 3, 2023
मात्र जेव्हा जेठालालने कारचा दरवाजा उघडला त्यावेळी ना दयाबेन गाडीतून उतरली ना सुंदर.. हे पाहिल्यानंतर जेठालालसोबतच सर्व गोकुळधाम मधील लोक नाराज होतात. यावेळी देखील मालिकेत दयाबेनचा ट्रॅक इतक्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने चाहत्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. त्यामुळे चाहते निर्मात्यांवर संतापले आहेत.
Tmkoc is not only playing with Jethalal’s feelings but the whole audience’s feelings 🥺💔#BoycottTMKOC pic.twitter.com/Qj5VWF60TN
— Virat Kohli FC18 𝕏 (@VKisGODofCric8) December 3, 2023
आता सोशल मिडियावर त्यांनी शोला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. ‘हा शो निर्मात्यांनी खराब केला आहे. दरवेळी पोपटलालचे लग्न झाले आणि दयाबेन परतली असं सांगून लोकांना वेड्यात काढले जाते. त्यांना फक्त पैसा आणि टीआरपी हवा असतो. ते प्रेक्षकांच्या भावनांशी खेळतात.’ असं नेटकरी म्हणू लागले आहेत. यावेळी केवळ गोकुळधाम मधील लोकच नाही तर प्रेक्षकही खुप नाराज झाले आहे. आणि त्यामुळे सध्या सोशल मिडियावर ‘#BoycottTMKOC’ ट्रेडिंग होताना दिसत आहे.