Mohammed Siraj : ‘तू सांगितलं का नाही…’, कर्णधार गिलवर सिराज का संतापला होता? पाहा VIDEO

Mohammed Siraj angry on Shubman Gill Video Viral : भारताने ओव्हल कसोटीत इंग्लंडवर 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला. 374 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 368 धावांवर सर्वबाद करत भारताने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या भेदक गोलंदाजीने भारताने हा सामना खिशात घातला. दरम्यान या सामन्यात एकदा सिराज कर्णधार शुबमन गिलवर संतापलेला दिसला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर कर्णधार गिलने खुलासा केला आहे.
मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ सामन्यात बहुतांश वेळ इंग्लंडच्या दबावाखाली होता. मात्र, चौथ्या दिवशी सिराज आणि प्रसिद्ध यांनी इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. जर त्या दिवशी खेळ वेळेआधी संपला नसता, तर भारताने तेव्हाच विजय मिळवला असता, असे कर्णधार शुबमन गिलने सांगितले. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे 4 गडी शिल्लक होते. सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने सलग दोन चौकारांसह दबाव वाढवला, पण भारताने जोरदार पुनरागमन केले.
सिराजचा राग आणि गिलचा खुलासा –
पाचव्या दिवशी इंग्लंडचा महत्त्वाचा फलंदाज जेमी स्मिथला सिराजने त्याच्या चौथ्या दिवसाच्या धावसंख्येत एकही धाव जोडू न देता बाद केले. यानंतर इंग्लंडचा डाव 347 धावांवर 7 असा झाला. सिराजने जेमी ओव्हरटन आणि प्रसिधने जोश टंग यांना बाद करत इंग्लंडला 9 बाद 357 धावांवर आणले. विजयासाठी 17 धावांची गरज असताना खांद्याच्या दुखापतीनंतरही ख्रिस वोक्स फलंदाजीला उतरला, तर गस अॅटकिन्सनने एकट्याने लढा देत सामना रोमांचक बनवला.
हेही वाचा – Mohammed Siraj : सिराज-प्रसिधचा जलवा कायम! कसोटी क्रमवारीतही घेतली मोठी झेप, बुमराह अव्वलस्थानी कायम
काय होती रणनीती?
Siraj had a lot of moments but one that stuck with me was when Jurel missed the run out and he looked at Gill with the most stunned and heartbroken look
“Nahi bola tu”
The man felt betrayed 😂 pic.twitter.com/pM2kevtQnb
— Saahil Sharma (@faahil) August 4, 2025
84व्या षटकात सिराज आणि गिल यांनी रणनीती आखली. अॅटकिन्सनला वाइड यॉर्कर टाकण्याचा आणि विकेटकीपर ध्रुव जुरेलने रनआऊटसाठी ग्लोव्हज काढून तयार राहण्याचा प्लॅन होता. मात्र, जुरेलचा थ्रो चुकला अॅटकिन्सन आणि वोक्स यांनी एक धाव घेऊन स्ट्राईक बदलली. यामुळे सिराज चिडला आणि त्याने गिलकडे तक्रारीच्या सुरात विचारणा केली की, ‘तू सांगितलं का नाही.’
हेही वाचा – Ravindra Jadeja : ‘गोऱ्यांचं तोंड तर पाहा…’, जडेजाने उडवली प्रेक्षकांची खिल्ली; व्हिडिओ व्हायरल
कर्णधार गिल काय म्हणाला?
यावर कर्णधार गिलने खुलासा केला की, “सिराजने मला सांगितले की ध्रुवला ग्लोव्हज काढायला सांग. मी ध्रुवला सांगितले, पण तितक्यात सिराजने रनअपला सुरुवात केली, ज्यामुळे ध्रुवला ग्लोव्हज काढायला वेळ मिळाला नाही आणि थ्रो चुकला आणि सिराज मला म्हणाला, ‘तू सांगितलं का नाही?’” यानंतर 86व्या षटकात सिराजने अॅटकिन्सनला यॉर्करवर बोल्ड करत इंग्लंडचा डाव संपवला. भारताने 6 धावांनी हा रोमांचक सामना जिंकला. सामन्याच्या शेवटच्या क्षणी ध्रुव जुरेल सिराजच्या पाठीवर स्वार होताना दिसला आणि भारतीय संघाचा जल्लोष अविस्मरणीय होता.





