“तुम्हाला तुमची खुर्ची वाचवता आली नाही…”; एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावरून अजित पवारांचा मिश्कील टोला

Eknath Shinde And Ajit Pawar | राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राज्यातील विविध मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न यावेळी विरोधक करण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी काल चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला.
तर दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांमधील टोलेबाजी चर्चेत राहिली. त्यांच्यातील संभाषणाची सध्या चांगलीच रंगली आहे.
दादांचं बरं, नो टेन्शन
“मी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणतेही ‘शीतयुद्ध’ नाही. प्रसिद्धीमाध्यमांनी आमच्यामध्ये भांडणे लावणे चुकीचे असल्याचे परखड मतप्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. तर एकनाथ शिंदेंनी सरकारची नवी टर्म असली, तरी आमची टीम जुनीच आहे. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होतो तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होते. पण आता आमच्या खुर्च्या बदलल्या असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे, नो टेन्शन, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
एकनाथ शिंदे यांच्या विधानानंतर अजित दादांनीही शिंदेंना टोला लगावला. “तुम्हाला (खुर्ची) फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू?” असे अजित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. अजित दादांचं विधान ऐकून एकच हशा पिकली. यावेळी सर्वांसह एकनाथ शिंदे आणि फडणवीसही खळखळून हसू लागले. मात्र त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “ठीक आहे, आमच्यात समजूदारपणा आहे.” त्यावर फडणवीसही ‘आमची फिरती खुर्ची आहे,’ असे म्हणाले.
मी तर शपथ घेणार…
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघंही उपमुख्यमंत्री आहेत. त्यावेळीही एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंचं मला माहीत नाही मी तर शपथ घेणार आहे असं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे हशा पिकला होता.
हेही वाचा:
“शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार?, अमित शहांनी दिली मोठी ऑफर” ; ठाकरे गटाचा धक्कादायक दावा





