Kris Srikkanth Statement : “आता तुझी गरज नाही, तू जाऊ शकतोस…”, मुंबई हार्दिकला संघातून हाकलणार? माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
Kris Srikkanth Statement : आगामी काळात मुंबई इंडियन्स हार्दिकला केवळ कप्तानीवरूनच हटवणार नाही, तर थेट संघातून बाहेरचा रस्ता दाखवेल, माजी क्रिकेटपटूचा दावा.

Kris Srikkanth Big Statement On Hardik Pandya : आयपीएल २०२६(IPL2026) च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा (MI) प्रवास आतापर्यंत अत्यंत निराशाजनक राहिला आहे. संघ सध्या गुणतालिकेत थेट नवव्या स्थानावर फेकला गेल्याने आधीच चाहत्यांमध्ये नाराजी आहे. अशातच आता मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या भविष्याबाबत एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांनी हार्दिक पंड्याबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. आगामी काळात मुंबई इंडियन्स हार्दिकला केवळ कप्तानीवरूनच हटवणार नाही, तर थेट संघातून बाहेरचा रस्ता दाखवेल, असे श्रीकांत यांचे म्हणणे आहे. (Kris Srikkanth Statement)
“आता तुझी गरज नाही, तू जाऊ शकतोस…” (Kris Srikkanth Statement)
Kris Srikkanth hints that Hardik Pandya’s stint with Mumbai Indians could be coming to an end#KSrikkanth #HardikPandya #MI #IPL #CricketTwitter pic.twitter.com/ho4Bef6TFO
— InsideSport (@InsideSportIND) May 14, 2026
माजी दिग्गज खेळाडू श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना हार्दिकच्या भविष्यावर मोठी टिप्पणी केली. ते म्हणाले, “हार्दिकच्या भविष्याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती किंवा अपडेट समोर आलेली नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता असं वाटतयं की, मुंबई इंडियन्सने हार्दिकला स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, ‘आता आम्हाला तुझ्या सेवेची गरज नाही, तू जाऊ शकतोस’.” श्रीकांत यांच्या मते, मुंबईचा संघ एकतर हार्दिकला लिलावापूर्वी रिलीज करेल किंवा ‘थँक्स भाई, प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद’ असे म्हणून पुढे निघून जाईल. आता आगामी काळात मुंबईचा संघ त्याला ट्रेड करतो की थेट रिलीज करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ( Kris Srikkanth Statement)
मुंबईतूनच झाली होती करिअरची सुरुवात – (Kris Srikkanth Statement)
विशेष म्हणजे हार्दिक पंड्याने आपल्या आयपीएल आणि क्रिकेट करिअरची सुरुवात मुंबई इंडियन्सपासूनच केली होती आणि याच कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघात आला होता. त्यानंतर २०२२ मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये (GT) सामील झाला, जिथे त्याने पहिल्याच हंगामात संघाला विजेतेपद मिळवून दिले आणि २०२३ मध्ये अंतिम फेरी गाठली. २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिककडे नेतृत्व सोपवले होते. मात्र, २०२६ च्या हंगामातील खराब कामगिरीनंतर आता हार्दिकचे मुंबई इंडियन्समधील दिवस भरले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.





