“तुम्ही आमच्या आयुष्यात आहात, हे आमचं भाग्य”; काकांसाठी अभिनेता रितेश देशमुखची खास पोस्ट, ते फोटो केले शेअर

Riteish Deshmukh post | अभिनेता रितेश देशमुख त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याचे वडिल दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी शेअर करत असतो. रितेशच आपल्या वडिलांवर असलेल प्रेम हे त्याच्या व्हिडिओंमधून दिसून येते. खरंतर रितेश देशमुख याची केवळ माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा ही ओळख नसून त्याने सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात आणि आज त्याच्या वाट्याला आलेले यश पाहण्यासाठी त्याचे वडिल हयात नाहीत. याची त्याला नेहमी मनामध्ये सल आहे. ती त्याने अनेकदा व्यक्तही केली आहे. विलासराव यांच्या निधानंतर देशमुख कुटुबांचा आधार गेला. पण याकाळात त्यांच्या कुटुंबावर मायेचं पांघरुण घातलं ते त्याचे काका म्हणजेच विलासराव यांचे बंधू दिलीपराव यांनी. त्यांनी कधीही मुलांना वडिलांच्या निधानानंतर पोरकेपणा भासू दिला नाही.
त्यामुळे दिलीपराव देशमुख यांच्याबद्दल विलासराव देशमुख यांच्या मुलांमध्ये आपुलीची भावना आहे. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने रितेशने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने काकांना म्हणजेच दिलीपराव देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेशने दिल्या शुभेच्छा
प्रिय काका ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमच्या मार्गदर्शनासाठी, प्रेमासाठी आणि अढळ पाठिंब्यासाठी आम्ही नेहमीच आभारी आहोत. तुम्ही आमच्या सर्वांसाठी शक्तीचा आधारस्तंभ आहात . तुम्ही आमच्या आयुष्यात आहात, हे आमचं भाग्य. तुम्हाला चांगलं आरोग्य, आनंद आणि दीर्घ, परिपूर्ण आयुष्य मिळो हीच शुभेच्छा.आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. असं रितेशने पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
रितेश देशमुख सध्या त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि चर्चा आहे. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती स्वतः रितेशच करणार आहे.




