Riteish Deshmukh post : व्हॅलेंटाईन डे आधीची रितेशची जेनिलियासाठी खास पोस्ट; जुने फोटो केले शेअर म्हणाला “माझी बायको…”
Riteish Deshmukh post : अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडियावरून पत्नी जेनिलियासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Riteish Deshmukh post : महाराष्ट्राची लाडके दादा आणि वहिनी म्हणून रितेश आणि जेनिलिया देशमुख यांच्या जोडीकडे पाहिले जाते. दोघांवर त्याचे चाहते अफाट प्रेम करतात. रितेश आणि जेनिलिया देखील आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून राहत असतात.
दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतात. आठवड्याभरापूर्वी व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला. आता एका दिवसावर व्हेलेंटाईन डे येऊन ठेपला आहे. त्याआधीच रितेश देशमुख याने सोशल मीडियावर पत्नी जेनिलियाठी खास पोस्ट शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.
या पोस्टमधून रितेशने त्याचे प्रेम खुलपणाने व्यक्त केले आहे. या पोस्टमध्ये त्याने जेनिलियासोबतेच काही जुने फोटो शेअर केले आहेत. रितेश आणि जेनिलिया यांच्या लग्नाला १४ वर्ष पूर्ण झाले आहेत. लग्नाला इतकी वर्षे उलटली तरी त्यांच्या नात्यातील गोडवा आजही ताजेपणा कायम ठेवून आहे.
“अगदी २४ वर्षांपूर्वी आपली मनं एकमेकांना भेटली आणि पुन्हा कधीच दूर गेली नाहीत. तू माझं सुरक्षित ठिकाण आहेस, माझी सगळ्यात भन्नाट सफर आहेस, माझं अलगद साकारलेलं स्वप्न आहेस. मला आयुष्यभरासाठी निवडल्याबद्दल थॅक्यू. माझी मैत्रीण, माझं प्रेम, माझी बायको… मी तुझ्यावर न संपणारं, वेड्यासारखं प्रेम करतो.” अशा खास शब्दांतील पोस्ट रितेशने पत्नी जेनिलियासाठी लिहिली आहे.
या पोस्टला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून, अनेकांकडून लाईक्स आणि कमेंट्स केल्या जात आहेत. रितेश आणि जेनिलिया पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांना भेटले. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
जेनिलिया चित्रपटात फारशी सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावरून चाहत्यांशी कनेट राहण्याचा प्रयत्न करते. याशिवाय सोशल मीडियावर मजेदार रील्स, व्हिडीओ देखीाल शेअर करत असते.
रितेशच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तो सध्या बिग बॅास ६ चे होस्ट म्हणून काम करत आहे. या शोमुळे महाराष्ट्राचा लाडका भाऊ अशी त्याची ओळख बनली आहे.
हेही वाचा : Vijaynagar: संसदेत विजयनगरचा मुद्दा; ‘भारताच्या पहिल्या गावात’ लवकरच मोबाइल नेटवर्क





