pavan choure : पुण्यातील एका अपघातामुळे महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगणा गौतमी पाटील चर्चेत आली आहे. ३० सप्टेंबरच्या दिवशी पुण्यात गौतमी पाटील हिच्या गाडीने पुणे मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षाला मागून जोरदार धडकी दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. या भीषण अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. तसेच रिक्षातील इतर दोघे प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातावरून एका मराठी अभिनेत्याने गौतमी पाटील हिच्यावर गंभीर आरोप करत तिला चांगलचं सुनावलं आहे. या अपघाताचा निषेधही अभिनेत्याने नोंदविला आहे. गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलाच आहे. मग तु काय गोरगरीब जनतेला ही त्रास द्यायचा ठेका घेतलाय का ?….असा थेट जाबच अभिनेत्याने गौतमी पाटील विचारला आहे. या अभिनेत्याचं नाव पवन चौरे असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून या अपघाताच्या घटनेचा निषेध केला आहे. View this post on Instagram A post shared by pavan.official (@pavan_choure.official) तुझी कार एका रिक्षा ला उडवते आणि तिथून तू पळून जातेस, परत तुझ्या गाडीत कोण कोण होत हे ही तुलाच माहीत. पोलिस यायच्या आधी तुझी गाडी उचली जाते प्रकरण दाबण्यासाठी. असा आरोपही अभित्याने केला आहे. बिचारा रिक्षा चालकाला किती लागलय, त्याच काय झालय? चौकशी न करता पळ काढता, कारण तुझे काळे धंदे बाहेर येतील म्हणून. असा खडा सवालही अभिनेत्याने केला आहे. आज रिक्षा चालक दीनानाथ रुग्णालयात व्हेंटेलीटरवर आहे. या घटनेला चार दिवस झाले तरी तू साध एक माणुसकीच्या नात्याने विचार पुस पण केली नाहीस हेच तुझे संस्कार का एक गोष्ट लक्ष्यात ठेव एक सामान्य माणूस जेवडा वरती घेऊन जातो तेवढाच खाली आपटू पण शकतो. तुझ्या ह्या कृत्याचा जाहीर निषेध. असं या अभिनेत्याने म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबरच्या दिवशी पहाटे ही अपघाताची घटना घडली होती. या अपघातावेळी गौतमी पाटीलही गाडीत होती असा गंभीर आरोप रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासीच चक्रे वेगाने फिरवली असून, अपघातातील कार पोलिसांनी जप्त केली आहे. हेही वाचा : बिहार निवडणूक : आज दुपारी निवडणूक आयोगाची मोठी पत्रकार परिषद ; मतदानाच्या तारखा होणार जाहीर?