तू हडकूळी अन्…; समंथाने ट्रोलर्सना चांगलचं सुनावलं; थेट वर्कआऊटचा व्हिडीओच शेअर केला म्हणाली…

Samantha Ruth : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री संमथा रुथ प्रभू हिला सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात आले होते. ती खूपच बारीक असून तिच्या शरीयष्टीवरून ट्रोलर्संनी बोलले होते. आता समंथाने ट्रोल करणाऱ्यांना खणखणीत प्रत्युत्तर देत थेट वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत ती आपल्या शरीरावर किती मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. समांथाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टा स्टोरीवर काल शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने ट्रोलर्सचा चांगलचं सुनावलं आहे. “मुद्दा हा आहे तुम्ही मला बारीक, आजारी किंवा काहीही म्हणू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः मी करत आहे, तो व्यायाम करुन दाखवत नाहीत.”असे ती ट्रोल करणाऱ्यांना म्हटली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत.
समंथाने साउथ अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, चार वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर समंथाचे दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबत नाव जोडले जात असून अफेअरच्या चर्चा होत आहेत. मात्र, यावर अद्यापर्यंत दोघांनीही अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही.
समंथाचे अनेक मोठे प्रोजेक्ट अॅानफ्लोअर
समंथाचे अनेक मोठे प्रोजेक्ट अॅान फ्लोअर आहेत. समंथा शेवटची सिटाडेल: हनी बनी या या प्राइम व्हिडीओवरील वेब सिरीजमध्ये दिसली होती. फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सिजनमध्येही समंथा दिसणार असल्याचे बोलले जात आहे. नुकताच फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सिजनचा टीझर रिलीज झाला आहे.
हेही वाचा : शेफाली जरीवालाच्या निधनानंतर आरती सिंगची भावूक पोस्ट





