“तुम्ही सगळे चांगले दिसता, चांगली पँट देखील घालता”; जया बच्चन यांच्या ‘त्या’ विधानावरुन शत्रुघ्न सिन्हांचा टोला

Jaya Bachchan Vs Shatrughan Sinha | ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन अनेकदा आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असतात. कायम त्या पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचे व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल झाले आहेत.
जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी पापाराझी यांच्या कपड्यांवर मोठं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यानंतर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी जया बच्चन यांचे नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला आहे.
एका कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम ढिल्लों हे दोघे उपस्थित होते. तिथे शत्रुघ्न सिन्हा यांनी जया बच्चन यांचे नाव न घेता, त्यांच्या “घाणेरडी पँट” या वाक्यावरून थेट टोला लगावला. ‘तुम्ही सगळे चांगले दिसता, चांगली पँट देखील घालता आणि चांगला शर्ट देखील घालता…’ हे ऐकून त्यांच्या शेजारी बसलेल्या पूनम ढिल्लों खळखळून हसू लागल्या आणि उपस्थित माध्यमांनीही शत्रुघ्न सिन्हांचे आभार मानले. Jaya Bachchan Vs Shatrughan Sinha |
View this post on Instagram
यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी जय बच्चन यांचं नाव घेतलं नाही, मात्र लगेच कळेल असं वक्तव्य केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय म्हणाल्या जया बच्चन?
एका कार्यक्रमात पापाराझींसोबत त्यांचं नातं कसं आहे? असा प्रश्न जया बच्चन यांना विचारण्यात आला. यावर जया बच्चन म्हणाल्या, “मला माध्यमांचा खूप आदर आहे. माझे वडील पत्रकार होते. पण हे पापाराझी कोण आहेत? कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही, घाणेरडी पँट घालून, हातात मोबाइल घेऊन फिरतात आणि फोटो काढतात. हे मीडिया कसे? त्यांचं एज्युकेशन काय? बॅकग्राऊंड काय?” अशा शब्दांत जया बच्चन यांनी पापाराझींवर टीका केली होती. याआधी देखील अनेकदा याच कारणामुळे जया बच्चन वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. Jaya Bachchan Vs Shatrughan Sinha |
हेही वाचा:
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ ! यूएस फेडरल रिझर्व्हच्या दरांचा परिणाम ; जाणून घ्या नवीन दर





