IND vs PAK : “तवा गरम आहे, थंड करुया…”, सकलेन मुश्ताकच्या ‘ओपन चॅलेंजला’ योगराज सिंगने दिले चोख प्रत्युत्तर

IND vs PAK Yograj Singh accept Saqlain Mushtaq Challenge : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात, पण यावेळी योगराज सिंग यांनी असे काही वक्तव्य केले आहे. ज्यामुळे १४० कोटी भारतीयांची मनं जिंकली आहेत. जेव्हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा यजमान देश पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पड,ला तेव्हा सकलेन मुश्ताकने पाकिस्तानच्या वतीने टीम इंडियाला खुले आव्हान दिले होते. ज्याला आता योगराज सिंग यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सकलेन मुश्ताकने दिले होते खुले आव्हान –
जेव्हा पाकिस्तान संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून पहिल्यांदा बाहेर पडला, तेव्हा मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघावर जगभरातून टीका झाली. पण यावेळी आपल्या संघाच्या कमकुवतपणावर बोलण्याऐवजी, माजी पाकिस्तानी खेळाडू सकलेन मुश्ताकने एका लाईव्ह शोमध्ये टीम इंडियाला खुले आव्हान दिले होते. तो म्हणाला होता की, भारताने पाकिस्तानसोबत १० कसोटी, १० एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळावेत, त्यानंतर कळेल की कोणता संघ चांगला आहे.
Saqlain Mustaq (@Saqlain_Mushtaq) 🗣️
"If you (India) are truly a good team, play 10 Test matches, 10 ODIs, and 10 T20Is against us, and it will become clear which team is the best."
— M (@anngrypakiistan) March 1, 2025
योगराज सिंग यांनी सकलेन मुश्ताकला दिले चोख प्रतुत्तर –
सकलेन मुश्ताकच्या या आव्हानाला आता योगराज सिंग यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. योगराज सिंह यांनी एएनआयला सांगितले की, “जर असे असेल तर सामना व्हायला हवा. त्यांनी सरकारला या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले आणि सांगितले की त्यांचा तवा थोडा गरम आहे, तो जरा थंड करुया. तसेच हा सामना कोणत्याही तिसऱ्या देशात आयोजित करूया.” त्यांनी दुबईचे नावही सांगितले. ते म्हणाले, चला दुबईत सामना होऊद्या, मग पाहूया कोण किती पाण्यात आहे.
भारताकडून काहीतरी शिका – योगराज सिंह
योगराज सिंग यांनीही पाकिस्तानला भारताकडून शिकण्यास सांगितले. ते म्हणाले, “मला वाटते जो देश ७८ वर्षात काही शिकला नाही, तेव्हा मी काय शिकवणार. जे लोक आपल्या लोकांवर अत्याचार करत राहतात, ते त्यांच्या देशावर अत्याचार करत राहतात. ते खेळाडू आणि जनतेबद्दल वाईट बोलत राहतात. तुम्ही त्या देशाला काय शिकवू शकता? जे फक्त आपल्यावर जळतात. तुम्ही जिंकला किंवा हरलात, तरी ज्याला स्वतःलाच हुशार मनायचे आहे, तो माणूस कधी प्रगती करू शकेल का? भारत कुठून कुठे गेला आहे आणि पाकिस्तानची स्थिती काय आहे? भारताकडून काहीतरी शिका.”





