Yogi Adityanath : लोकशाहीची खरी शक्ती लोकांच्या विश्वासात; योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले मत
लोकशाहीची खरी शक्ती सामान्य नागरिकांच्या घटनात्मक संस्थांवरील विश्वासात दडलेली आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केले.

Yogi Adityanath : लोकशाहीची खरी शक्ती सामान्य नागरिकांच्या घटनात्मक संस्थांवरील विश्वासात दडलेली आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केले.
लखनौ येथे उत्तर प्रदेश लोकायुक्ताच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात ते (Yogi Adityanath) बोलत होते. लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा विश्वास जिंकणे आणि शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हाच सुराज्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे.
२०१७ मध्ये सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीबाबत सर्वाधिक तक्रारी होत्या. ई-पॉस मशिन आणि केंद्रीय देखरेख यंत्रणेमुळे आज रेशन वितरणातील तक्रारींची संख्या शून्यावर आली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
महसूल विभाग आणि जमीन विवादाची २०१७ मध्ये प्रलंबित असलेली ३४ लाख प्रकरणे (जमीन विवाद, वारसा हक्क, मोजणी) निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्यात आली असून, ३० दिवसांत निर्णय न झाल्यास प्रकरण डीमड् अप्रूव्ह्ड मानले जाण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तक्रार निवारण प्रणालीचा गैरवापर करणाऱ्या आणि सवय म्हणून खोट्या किंवा बिनबुडाची तक्रारी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले. डीबीटीच्या माध्यमातून आज थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असून, यामुळे व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास आणखी बळकट झाला आहे असे ते (Yogi Adityanath) म्हणाले.






