Yogi Adityanath: “बाप्पाच्या कृपेने सर्व अडथळे दूर होवोत..” ; योगी आदित्यनाथांकडून देशवासियांना शुभेच्छा
Yogi Adityanath: देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सर्व राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Yogi Adityanath: देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सर्व राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त राज्यातील नागरिक आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता आणि शुभ कार्यांचे प्रणेते असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सर्वाना शुभेच्छा देताना सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो असेही म्हटले आहे.
मेरे सम्मानित प्रदेशवासियों,
सामाजिक एकता एवं राष्ट्र के प्रति अपने संकल्प को सुदृढ़ करने वाले महापर्व गणेश चतुर्थी की आप सभी को कोटि-कोटि मंगलकामनाएं।
गणेशोत्सव के ज्ञान, विवेक और कर्म की भावना सृजन तथा निर्माण के स्वरूप भगवान विश्वकर्मा के पूजन में दिखाई देती है। 17 सितंबर को… pic.twitter.com/HxsJta5uYm
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 14, 2026
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी,“गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व अडथळे दूर होवोत, प्रत्येक संकल्प पूर्ण होवो आणि प्रत्येकाचे जीवन सुख, समृद्धी आणि मांगल्याने भरून जावो,” अशी प्रार्थना योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यांनीही देशवासीयांना ‘गणपती बाप्पा मोरया!” असे म्हणत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.





