#AsianOlympicQualifiers : नेमबाज योगेश सिंगची सुवर्ण कामगिरी…

Jakarta : भारताचा नेमबाज योगेश सिंगने रविवारी जकार्ता, इंडोनेशिया येथे आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. नॉन-ऑलिम्पिक डिसिप्लिन प्रकारात 20 नेमबाजांमध्ये स्पर्धा करत, योगेश सिंगने 572 गुण मिळवून पोडियमवर अव्वल स्थान पटकावले. त्याने 10 व्या टप्प्यात 187, 20 व्या टप्प्यात 191 आणि 150व्या टप्प्यात 194 गुण मिळवले.
मंगोलियन नेमबाज दावाखु एन्खताईवान याने समान गुणांसह रौप्य पदक जिंकले. मात्र भारतीय नेमबाज अव्वलस्थानी राहिला, कारण त्याने एन्खताईवानच्या 7 एक्स च्या तुलनेत 17 एक्स शॉट्स (अचूक शॉट्स) लावले. शनिवारी पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये भारताच्या विजयवीर सिद्धूला पराभूत करून सुवर्ण जिंकणारा कझाकिस्तानचा नेमबाज निकिता चिर्युकिन याला 568 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
A happy Sunday indeed as 🇮🇳’s Yogesh Singh shines with a glorious #Gold 🥇 in Men’s Standard Pistol event at the #AsianOlympicQualifiers🔫, Jakarta 🥳
Many congratulations champ 🥳👏👏 pic.twitter.com/wgUZynhEYP
— SAI Media (@Media_SAI) January 14, 2024
भारताचा अमित कुमार 565 गुणांसह सहाव्या तर ओम प्रकाश 553 गुणांसह 12व्या स्थानावर आहे. पंकज यादव, फक्त रँकिंग पॉइंट्स (आरपीओ) साठी नेमबाजी करत 562 गुण मिळवण्यात यशस्वी झाला.
Asian Olympic Qualifiers Shooting 2024 : विजयवीरने रौप्यपदकासह मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…
योगेश सिंग, अमित कुमार आणि ओम प्रकाश या भारतीय त्रिकुटाने 1690-34x स्कोर केला. आणि या स्पर्धेत भारतीय संघानं क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तर टीम व्हिएतनामने 1679–29x गुणांसह रौप्य पदक जिंकले, तर यजमान इंडोनेशियाने कांस्यपदक मिळवले.





