Yogesh Kadam : वाळू चोरीच्या आरोपांवर योगेश कदमांचे परबांना थेट आव्हान म्हणाले “पुरावे द्या नाहीतर….”

Anil Parab | Yogesh Kadam | ३० जूनपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिविशेनास सुरूवात झाली असून, यंदाचे अधिवेशन विविध प्रश्नांमुळे गाजताना पाहायला मिळत आहे. विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशीच्या कामकाजात दिवसभरासाठी विरोधी पक्षातील सदस्य नाना पटोले यांच्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निलंबणाची कारवाई करवाई केली.
पटोले यांच्यावर कारवाई होताच विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहात मोठा गदारोळ घातला. यामुळे काही वेळेसाठी विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. अशातच उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम हे स्वतः वाळू पकडतात मात्र ती गरिबांना दिली जात नाही, असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला असून, पुढील तीन दिवसात सभागृहात याचे पुरावे देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, परबांनी केलेला हा गंभीर आरोप योगेश कदम यांनी फेटाळून लावला आहे.
जर का ते पुरावे नाही देऊ शकले तर त्यांनी माझी जाहीर माफी मागावी असे थेट आव्हानच कदमांनी दिले आहे. यामुळे आता अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय सुडाच्या भावनेतूनच त्यांनी हे वक्तव्य केले असल्याचा आरोप योगेश कदम यांनी केला आहे.
….तर मी राजीनामा देईन
आजवर मी राजकारणात २२ वर्ष आहे लोकप्रतिनिधी म्हणून मागील सात वर्ष काम पाहतोय. माझ्या मतदारसंघांमध्ये देखील मंत्री म्हणून देखील माझ्यावर आजवर कोणीही कुठलेही आरोप करूच शकले नाहीत. स्वच्छ छबी मी आजपर्यंत टिकवली असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
मी स्वतः कुणाकडे वाळूची गाडी अडवली असेल पकडली असेल वाळूच्या डेपोवर गेलो असेल आणि ही कारवाई केल्यानंतर आपण ती मागे घ्यायला लावली असेल आणि असं कुणीकडेही झालं असेल तर मी त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही मी स्वतः राजीनामा देऊन टाकेन, असे देखील ते योगेश कदम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : Pune District : शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?





