satara | निरोगी आरोग्यासाठी योगयुक्त जीवन शैली ही काळाची गरज

वाई, (प्रतिनिधी) – आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात योगाला अनन्य साधारण महत्व आहे. निरोगी जीवन व्यथित करण्यासाठी नियमित योगा, प्राणायाम करणे काळाची गरज आहे. सध्याच्या गतिमान युगात निरोगी आरोग्यासाठी योगाला जीवनाचा अविभाज्य घटक करा, असे आवाहन ज्येष्ठ योगशिक्षक धनंजय मलटने यांनी केले.
येथील सर्वोदय सेवा ट्रस्टतर्फे वाईत आयोजित योग शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी योगशिक्षक रामदास राऊत, नीलेश पिसाळ, संतोष शिंदे, पी. एस. भिलारे, विनायक भास्कर, सारिका गवते यांनी मार्गदर्शन केले. हे शिबिर तीन दिवस चालणार आहे
यावेळी सर्वोदयचे अध्यक्ष संजय जेधे, उपाध्यक्ष प्रकाश वाडकर, सचिव संतोष वाडकर, खजिनदार ज्ञानदेव वाशिवले, आनंद चिरगुटे, रामदास राऊत, किशोर गायकवाड, माणिक बनसोडे, विजय येवले, सहदेव फणसे, नवीन कांबळे, आप्पा मांढरे, बाबा फणसे, संतोष शिंदे, लक्ष्मी कळंबे, दीपाली शिंदे, वैशाली वाडकर व इतर सभासद उपस्थित होते.





