नेवासा : त्रिमूर्ती संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा; ७ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नेवासा : नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुलात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी योगाभ्यासातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, त्रिमूर्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूल आणि त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यामधील सुमारे ७ हजार विद्यार्थी सहभागी झाले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनीही जोमदार सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमासाठी शिवछत्रपती क्रीडांगणावर भव्य योगशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम व तंदुरुस्तीसाठी आवश्यक शारीरिक हालचाली शिकवल्या गेल्या.
संस्थेचे विश्वस्त आ. चेतन चव्हाण पाटील, डॉ. श्रुती आमले पाटील, सचिव मनीष घाडगे पाटील, नेवासा तहसीलदार संजय बिराजदार, गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, प्राचार्य सोपान काळे, सचिन कर्डिले, श्रीदेवी नायर, क्रीडा समन्वयक संजयसिंह चव्हाण, विभागप्रमुख जितेंद्र पाटील, एकनाथ कापसे, नामदेव ताके, पांडुरंग कांबळे, संतोष निंबाळकर, अशोक कानवडे, संतोष राऊत, मिलिंद सोनवणे, उमाजी जंगले, संजय गडाख, बाबासाहेब तांबे, शिवाजी झाबाडे, सैनिकी प्रशिक्षक प्रमुख परमेश्वर कसाळ, क्रीडा प्रमुख संभाजी निकाळजे, छबुराव काळे, अभिजीत दळवी, महादेव काकडे, सर्व सैनिकी व क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांसह संपूर्ण त्रिमूर्ती परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.





