दुबई : येमेनमधील हौथी बंडखोरांनी आज लाल समुद्रातून प्रवास करणाऱ्या लायबेरियाच्या तेलाच्या टँकरवर रॉकेटचा मारा केला. हे तेलवाहू जहाज एडणच्या आखातातून प्रवास करत असताना हा हल्ला झाला होता. इस्रायलने हौथींवर हवाई हल्ला केल्यापासून प्रथमच हौथींकडून अशा प्रकारचा रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. इस्रायलने गेल्या वर्षी नोव्हंबरमध्ये हमासविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर हौथींकडून लाल समुद्रातून वाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ले करायला सुरुवात केली होती. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून हौथींकडून लाल समुद्रात होत असलेले हल्ले थांबले होते. मात्र हे हल्ले का थांबवले गेले होते, याबाबत हौथींकडून कोणतेही स्पष्टिकरण देण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी इराणमध्ये हमासचा राजकीय नेता इस्लमाईल हनिएहची हत्या झाल्यावर हौथींकडून हे हल्ले पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. हौथींना इराणचे पाठबळ आहे. हेच यामागील खरे कारण आहे. शनिवारी करण्यात आलेला हा हल्ला एडनच्या सुमारे २२५ किलोमीटर आग्नेयेस एडनच्या आखाताच्या एका भागात झाला. या भागात हौथींकडून यापूर्वी असंख्य हल्ले झाले आहेत. तोहौथींनी डागलेले रॉकेट ग्रोटोन या जहाजावर आदळले. यामुळे जहाजाचे किरकोळ नुकसान झाले, असे संयुक्त सागरी माहिती केंद्राने सांगितले. मात्र रॉकेट थोडक्यात बचावल्याचे यूएस नेव्हीच्या देखरेखीखालील बहुराष्ट्रीय देखरेख गटाने म्हटले होते. विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे केंद्राने सांगितले. जहाज जवळच्या बंदरात वळवण्यात आल्याची माहिती मिळाली. हौथींनी अमेरिकेचे हेरगिरी करणारे एक ड्रोन देखील पाडल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या या हेरगिरी ड्रोनचा फोटोही हौथींकडून इंटरनेटवर प्रसिद्ध करणायात आला आहे.