Pune gramin : येडगावच्या ‘कुकडी व्हॅली’ची राष्ट्रीय झेप; शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी ‘एम्पॉवरिंग इंडिया अवॉर्ड २०२६’चा मान
"कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, येडगाव" या कनिष्ठ महाविद्यालयास शैक्षणिक उत्कृष्टता- एम्पॉवरिंग इंडिया अवार्ड २०२६"ने सन्मानित करण्यात आले.

Pune gramin : जुन्नर तालुक्यातील “कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, येडगाव” या कनिष्ठ महाविद्यालयास शैक्षणिक उत्कृष्टता- एम्पॉवरिंग इंडिया अवार्ड २०२६”ने सन्मानित करण्यात आले.
स्कूल ग्रेड व फिट इंडिया यांच्या माध्यमातून अरूकस मीडीया प्रा.ली. दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील प्रत्येक राज्यातील गुणवत्तापूर्वक शिक्षण देणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना राष्ट्रीय स्तरावर “शैक्षणिक उत्कृष्टता- एम्पॉवरिंग इंडिया अवार्ड २०२६”हे पुरस्कार भारत पर्यावास केंद्र, नवी दिल्ली येथे दिनांक २८ जुलै रोजी डॉक्टर सुकांता मुजुमदार, शिक्षण राज्यमंत्री, भारत सरकार व मनोज तिवारी, खासदार , दिल्ली (नॉर्थ ईस्ट) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
त्यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठीचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील , जुन्नर तालुक्यातील “कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, येडगाव” या कनीष्ट महाविद्यालयास डॉ. सुकांता मुजुमदार ,शिक्षण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर शाळेचे अनेक हितचिंतक,स्नेही व पालक वृंद यांच्या कडून शाळेचे व शालेय व्यवस्थापनाचे अभिनंदन करण्यात आले. हा पुरस्कार शाळेच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचे, समर्पित शिक्षकांचे, शिस्तप्रिय व कष्टाळू विद्यार्थ्यांचे आणि पालकांच्या शाळेप्रती असणाऱ्या विश्वासाचे यश आहे अशा सद्भावना शाळेच्या प्रिन्सिंपल पि मेनन व सचिव विष्णू थोरवे यांनी व्यक्त केल्या.





