Yavat News | हिंसाचार प्रकरणात ९३ जणांवर गुन्हे ; १९ जणांना न्यायालयीन कोठडी..

प्रभात वृत्तसेवा
यवत- यवत (ता. दौंड) येथील झालेल्या घटनेमुळे यवत पोलिसांनी जवळपास ९३ जणांवर व अज्ञात ५०० ते ६०० जणांवर यवत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी १९ जणांना यवत पोलिसांनी अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने बुधवार (दि.६) पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना बुधवार (दि. ६) दौंड येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.
यवत येथे घडलेल्या वादामुळे जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश देण्यात आले होते. त्यानुसार यवत येथे पोलिसांनी जमावबंदी लागू केली होती. यवत परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल असून पोलिसांच्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण असल्याची माहिती दिल्याने जिल्हाधिकारी यांनी पाच दिवसानंतर अंशत: सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.यवत पोलिसांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे जमावबंदीबाबत पत्रव्यवहार केला असून उशीरपर्यंत आदेश आला नसल्याची माहिती तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली आहे.




