यवत : गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक पेटला

Updated On:

यवत :- शिरूर-सातारा राज्य मार्गावर गॅस  सिंलेडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला (दि.22) रात्री एकच्या सुमारास आग लागली होती. घटनेत गॅस वाहतूक करणारा ट्रक जळून खाक झाला. मात्र, या घटनेत जीवितहानी टळली आहे. यावेळी आगीमुळे शिरूर- सातारा राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आग विझवल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली.

यवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएनजी गॅस भरून हा ट्रक रांजणगाव येथून चौफुला बाजूकडे येत होता. खोपोडी हद्दीत आला असता ट्रकमधील केबिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर आग भडकून ट्रकने पेट घेतला.

ट्रकचालक श्रीराम सांगळे (वय 35, रा. पाटस, ता. दौंड जि. पुणे) हे ट्रकच्या बाहेर पडल्यामुळे ते बचावले. त्यानंतर पेटलेल्या ट्रकची आग विझवण्यासाठी दौंड नगरपरिषद तसेच कुरकुंभ एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी असे तीन अग्नीशमन बंब पाचारण करण्यात आले होते. तीन बंबांनी लागलेली आग आटोक्‍यात आणण्यासाठी तीन तासांचा वेळ गेला. परंतु ट्रक पूर्णतः जळून खाक झाला. ट्रकमध्ये साठ सीएनजी गॅस भरलेल्या टाक्‍या होत्या.

आणखी संबंधित बातम्या

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

2026-10-06 13:40:59

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

LPG Price Hike : सणासुदीत महागाईचा भडका.! गॅस सिलिंडर तब्बल 'इतक्या' रुपयांनी महाग, काय आहेत नवे दर?

2026-10-01 18:33:12

LPG Price Hike : सणासुदीत महागाईचा भडका.! गॅस सिलिंडर तब्बल 'इतक्या' रुपयांनी महाग, काय आहेत नवे दर?

LPG Cylinder Price : सणासुदीत महागाईचा भडका! व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग; घरगुती सिलेंडरचे दर किती?

2026-10-01 09:29:25

LPG Cylinder Price : सणासुदीत महागाईचा भडका! व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग; घरगुती सिलेंडरचे दर किती?

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

2026-09-24 15:39:58

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

2026-09-20 21:16:01

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !