satara | तुकाराम बिजेनिमित्त बनपुरीत यात्रा

वडूज, (प्रतिनिधी) – तुकाराम बीज यात्रेनिमित्त बनपुरी (ता. खटाव) येथे उद्या, दि. 27 ते शुक्रवार, दि. 29 या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवारी (दि. 27) सकाळी 10 ते 12 या वेळेत ह. भ. प. सचिन भाट तासगावकर यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी 12.15 वाजता संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पपवृष्टी, महाप्रसाद, दुपारी 2 वाजता तुकोबारायांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक,
रात्री अर्चना सावंत प्रस्तुत ‘नार नखरेवाली’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार, दि. 28 रोजी बैलगाड्यांच्या शर्यती होणार आहेत. या शर्यतीतील अंतिम फेरीच्या विजेत्यांना अनुक्रमे 77 हजार 777, 55 हजार 777, 37 हजार 777, 17 हजार 777, 11 हजार 777, सात हजार 777 आणि पाच हजार 777 रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
त्याचबरोबर रात्री कोल्हापूर येथील किशोरकुमार म्युझिकल नाइट हा ऑर्केस्ट्रा होणार आहे. शुक्रवार, दि. 29 रोजी कुस्त्यांचे मैदान होणार असून, 50 रुपये ते दोन लाख 51 हजार रुपये इनामाच्या कुस्त्या होणार आहेत. रात्री गीतांजली सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार असून, या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.





