नवी दिल्ली –विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले. तसेच, राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवारी दिल्याबद्दल विरोधकांचे आभारही मानले.
देशातील सध्याची स्थिती चिंता वाटण्याजोगी आहे. सध्या सुरू असलेल्या विषारी राजकारणामुळे लोकशाही आणि सामाजिक सलोख्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशावेळी कुठलेही भय न बाळगता नव्या राष्ट्रपती कार्य करतील अशी आशा प्रत्येक भारतीय बाळगून आहे, असे सिन्हा यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले.