“यशवंत फोर्ड’ 4 ऑक्टोबरपासून लोकसेवेत

नगर -यशवंत फोर्ड शोरुम येत्या रविवारपासून (ता. 4 ऑक्टोबर) लोकसेवेत दाखल होत आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते व आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा होईल, असे यशवंत फोर्डचे संचालक धनंजय गाडे पाटील यांनी सांगितले.
दुपारी चार वाजता एमआयडीसीमधील यशवंत फोर्ड, बी-10, नगर-मनमाड रोड येथे हा उद्घाटन सोहळा होईल. आमदार अरुणकाका जगताप व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखालील या उद्घाटन सोहळ्यास फोर्ड कंपनीचे जनरल मॅनेजर अनुज त्यागी, महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, विभागीय मॅनेजर नीतेश कुमार, विभागीय विक्री व्यवस्थापक रवीकाश सिंग आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे संचालक सूर्यकांत गाडे पाटील व जितेंद्र गाडे पाटील यांनी सांगितले.
फोर्ड कंपनीची सर्व वाहने ग्राहकांसाठी येथे उपलब्ध आहेत. उद्घाटनानिमित्त फोर्डच्या ग्राहकांना लेबर सर्व्हीसमध्ये 20 टक्के विशेष सूट देण्यात येणार आहे. एंडेव्हर, इकोस्पोर्टस, एस्पायर, फ्रिस्टाईल, फिगो आदी प्रकारातील वाहने येथे उपलब्ध आहेत. सर्वच वाहनांत कंपनीने आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सर्व वाहने डिझेल व पेट्रोल इंधनात उपलब्ध आहेत. सात एअरबॅग, सनरुफ, टीसीएस, एआरपी, ब्ल्यू लिंक, टच स्क्रीन, नेव्हीगेशन, बटन स्टार्ट, हाय ग्राऊंड क्लिअरन्स, अग्रेसिव्ह लूक, अशी विविध प्रकारची फिचर्स या वाहनांत कंपनीने उपलब्ध करुन दिली आहेत.
येथील कर्मचारी वर्ग कौशल्यप्राप्त असून, अनुभवी देखील आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वाहनांची सर्व्हीसिंग देखील समधानकारक मिळेल. जिल्ह्यातून येणाऱ्या ग्राहकांसाठी येथे पार्किंगची मोठी व्यवस्था आहे. तसेच संपूर्ण शोरुम वातानुकुलित असल्याची माहिती गाडे पाटील यांनी दिली. अधिक माहितीसाठी संपर्क : 9552003552.





