पूरग्रस्त भागांची यशराज देसाईंकडून पाहणी; मदतीसाठी तत्परतेचा दिला दिलासा…
Updated On:

मोरगिरी : पाटण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची आज लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांनी विविध ठिकाणी पाहणी केली.
यावेळी देसाई यांनी नागरिकांची विचारपूस करत शक्य ती सर्व मदत तातडीने करण्यात येईल. कोणतीही गरज भासल्यास नामदार साहेबांच्या कार्यालयाशी आणि अशक्य कार्यालयास त्वरित संपर्क साधा, असा दिलासा दिला.
मुळगाव पूल गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली गेला असून त्याची पाहणी दादांनी केली. पूल बंद असल्यामुळे नागरिकांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे का, याची माहिती त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेतली.





