IND vs ENG : यशस्वी जैस्वालने मोडला रोहित शर्माचा विक्रम, SENA देशांत ठरला अव्वल!

IND vs ENG 2nd Test Yashasvi Jaiswal Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली आहे. सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने मागील सामन्याप्रमाणे या सामन्यातही दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत जैस्वालने आपले अर्धशतक पूर्ण केले असून तो ६२ धावांवर नाबाद आहे. या अर्धशतकी खेळीसह त्याने रोहित शर्माचा एक विक्रम मोडला आहे.
जैस्वालने मोडला रोहितचा विक्रम –
SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक पन्नासपेक्षा जास्त धावांच्या खेळ्या करण्याच्या बाबतीत जैस्वालने रोहित शर्माला मागे टाकले आहे. भारताचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर म्हणून SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) चारवेळा पन्नासहून अधिक जास्त धावसंख्येच्या खेळी साकारल्या होत्या. तर, यशस्वी जैस्वालने सलामीवीर म्हणून SENA देशांमध्ये आता ५ अर्धशतके आणि त्यापेक्षा जास्त धावसंख्येचा विक्रम नोंदवला आहेत.
यशस्वी जैस्वालने झळकावले अर्धशतक
Yashasvi Jaiswal just doesn’t stop! 💥
Another confident knock against England – composed, classy & commanding.#YashasviJaiswal #ENGvIND #TestCricket pic.twitter.com/VLIb2BGD3F— Ganesh 🇮🇳 (@GaneshVerse) July 2, 2025
जैस्वालने इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १०१ धावांची खेळी साकारली होती. याआधी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भाग घेतला होता. या मालिकेत त्याने ५ सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांसह एकूण ३९१ धावा केल्या होत्या. पर्थ येथील कसोटी सामन्यात जैस्वालने १६१ धावांची दमदार खेळी केली होती, तर मेलबर्न कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ८२ आणि दुसऱ्या डावात ८४ धावा करून तो बाद झाला होता.
हेही वाचा – IND vs ENG : दुसऱ्या कसोटीसाठी कुलदीपला का दिली नाही संधी? शुबमन गिलने सांगितलं कारण
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सलामीवीर म्हणून त्याने इंग्लंडमध्ये एकूण तीनदा पन्नासहूनअधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये रोहितने ६ कसोटी सामन्यांमध्ये ४४.५४ च्या सरासरीने ४९० धावा केल्या. याशिवाय, ऑस्ट्रेलियातही सलामीवीर म्हणून त्याने एक अर्धशतक झळकावले आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीमध्ये विशेष यश मिळवता आले नाही. विशेष म्हणजे, इंग्लंड मालिकेपूर्वीच रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता तो फक्त एकदिवसीय (ODI) क्रिकेट स्वरूपात खेळताना दिसेल.





