IND vs WI : जैस्वालच्या रनआऊटवरून वाद! गिलवर ठपका की खेळाचा भाग? काय म्हणाला? पाहा VIDEO

यशस्वी जैस्वाल काय म्हणाला?
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रसारकाशी बोलताना यशस्वी जैस्वाल म्हणाला, “मी नेहमीच माझी खेळी शक्य तितकी लांब खेळण्याचा प्रयत्न करतो. मी खेळपट्टीवर असताना खेळ पुढे नेण्याचा आणि शक्य तितका वेळ खेळण्याचा माझा प्रयत्न असतो.” रनआऊटबाबत विचारले असता त्याने सांगितले, “हा खेळाचा भाग आहे, त्यामुळे मी याचा जास्त विचार करत नाही. माझी आणि संघाची उद्दिष्टे साध्य करण्यावर माझा भर आहे. मी फक्त खेळात टिकून राहण्याचा आणि खेळी लांबवण्याचा प्रयत्न करतो. खेळपट्टी अजूनही चांगली आहे. आम्ही उत्तम गोलंदाजी करत आहोत आणि वेस्ट इंडिजचा पहिला डाव लवकरात लवकर संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
Yashasvi Jaiswal’s reaction said it all.💔#YashasviJaiswal pic.twitter.com/AFjEht6UII
— Harshit Rana (@RarshitHana) October 11, 2025
भारताचा पहिला डाव 518 धावांवर घोषित –
#ShubmanGill should have sacrificed his wicket as #YashasviJaiswal nearing 200 but got run out 😭
Selfish Shubman Gill 💔#INDvWI
pic.twitter.com/8al5UDffEl— Adorable (@rehnedotumm_) October 11, 2025
भारतीय संघाने पहिल्या डावात 5 गड्यांच्या मोबदल्यात 518 धावा करून डाव घोषित केला. यशस्वी जैस्वालच्या 175 धावांशिवाय शुबमन गिलने 129 धावा, साई सुदर्शनने 87 धावा, नितीश कुमार रेड्डीने 43 धावा आणि ध्रुव जुरेलने 44 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात खेळायला उतरलेल्या वेस्टइंडीजने दुसऱ्या दिवसअखेर 4 गड्यांच्या मोबदल्यात 140 धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजांपैकी रवींद्र जडेजाने 3 आणि कुलदीप यादवने 1 विकेट्स घेतली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ ठरणार महत्त्वाचा –
तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाची नजर वेस्ट इंडिजचा पहिला डाव लवकरात लवकर संपवण्यावर असेल. भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून, सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवली आहे. यशस्वी जैस्वालच्या रनआऊटवरून चर्चा सुरू असली तरी त्याने याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवत संघाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केले आहे.





