Yashasvi Jaiswal : धक्कादायक! यशस्वी जैस्वाल रुग्णालयात दाखल; मुंबई-राजस्थान सामन्यानंतर अचानक बिघडली प्रकृती

Yashasvi Jaiswal Hospitalised : टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला मंगळवारी ‘एक्यूट गॅस्ट्रोएन्टेरिटिस’च्या (पोटाचा गंभीर त्रास) त्रासामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यात सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईने राजस्थानचा पराभव केल्यानंतर काही तासांतच जैस्वालची प्रकृती बिघडली.
‘एक्यूट गॅस्ट्रोएन्टेरिटिस’ असल्याचे निदान –
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर यशस्वीच्या पोटात तीव्र कळा येऊ लागल्या. त्याला तातडीने पिंपरी-चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला ‘एक्यूट गॅस्ट्रोएन्टेरिटिस’ असल्याचे निदान झाले. रुग्णालयात त्याच्या सीटी स्कॅन आणि अल्ट्रासाऊंड चाचण्या करण्यात आल्या असून त्याला आयव्हीद्वारे औषधे देण्यात आली आहेत.
नई दिल्ली: क्रिकेटर यशस्वी जायसवाल हॉस्पिटल में भर्ती, सैयद मुश्ताक अली ट्रॉफी में मैच के बाद बिगड़ी तबियत, डॉक्टरों ने दी आराम करने की सलाह@ybj_19 #YashasviJaiswal #Hospitalised #SMAT2025 @BCCI @ICC #PeoplesUpdate pic.twitter.com/rn1ZJrVUf7
— People’s Update (@PeoplesUpdate) December 17, 2025
डॉक्टरांनी त्याला सध्या काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यशस्वी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने ७८ च्या सरासरीने १५६ धावा कुटल्या होत्या. तसेच, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या तीन सामन्यांत त्याने १४५ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – Varun Chakaravarthy : फिरकीचा जादूगर वरुण ठरला नंबर-१! बुमराहला मागे टाकत कोणालाच न जमलेला केला पराक्रम
सर्फराझचे वादळ आणि मुंबईचा विजय –
एकीकडे यशस्वीच्या प्रकृतीची चिंता असताना, दुसरीकडे मैदानावर मुंबईच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांची पिसं काढली. राजस्थानने दिलेल्या २१७ धावांचे विशाल लक्ष्य मुंबईने ७ गडी राखून आणि ११ चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले.या विजयाचे शिल्पकार सर्फराझ खान आणि कर्णधार अजिंक्य रहाणे ठरले.
सर्फराझने अवघ्या २२ चेंडूत ७३ धावांची विस्फोटक खेळी केली, ज्यामध्ये ७ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. त्याने आणि रहाणेने दुसऱ्या विकेटसाठी फक्त ३९ चेंडूत १११ धावांची अविश्वसनीय भागीदारी केली. रहाणेनेही जबाबदारीने खेळत ४१ चेंडूत नाबाद ७२ धावा (७ चौकार, ३ षटकार) केल्या.
हेही वाचा – Prithvi Shaw : पृथ्वी शॉचे आयपीएल लिलावात हार्टब्रेक ते होमकमिंग: इन्स्टा स्टोरीने घेतला असा यू-टर्न!
सुरुवातीला यशस्वी जैस्वाल १५ धावा करून बाद झाला होता, पण त्यानंतर सर्फराज आणि रहाणेच्या जोडीने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले. या विजयामुळे मुंबईने सुपर लीग ग्रुप ‘बी’ मध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.





