IND vs ENG : ख्रिस वोक्सच्या घातक चेंडूने जैस्वालच्या बॅटचे केले दोन तुकडे, पाहा VIDEO

जैयस्वालसोबत घडली विचित्र घटना –
वास्तविक, सामन्याच्या सुरुवातीला यशस्वी जैस्वालच्या बॅटची मूठ तुटली. भारतीय डावाच्या ९व्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स गोलंदाजी करत होता आणि स्ट्राइकवर यशस्वी जैस्वाल होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर जैस्वालने बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त उसळला आणि थेट त्याच्या बॅटच्या मूठीजवळ जाऊन आदळला. चेंडूचा प्रभाव इतका तीव्र होता की जैस्वालच्या बॅटची मूठ तुटली. हे पाहून मैदानावरील खेळाडू, पंच आणि चाहते सर्वच थक्क झाले.
Bat be like “mujhe kyun toda?” 😭🏏#ENGvIND 👉 4th TEST, DAY 1 | LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/0VxBWU8ocO pic.twitter.com/q80vIuwqIj
— Star Sports (@StarSportsIndia) July 23, 2025
जैस्वालच्या एका बॅटची किंमत १ लाख रुपये –
Bat Breaks, Spirit Doesn’t: Jaiswal Stuns Even as the Willow Gives Way💥🧢#INDvsENG #ENGvsIND #INDvENG #ENGvIND #YashasviJaiswal #BatBreakMoment #CricketDrama #NeverBackDown pic.twitter.com/U2G7ah1Wjj
— Yolo247 (@Yolo247Official) July 23, 2025
यानंतर यशस्वी जैस्वालने तुटलेली बॅट पाहिली आणि तातडीने ती बदलण्यासाठी डगआउटकडे इशारा केला. त्यानंतर करुण नायर मैदानावर नवीन बॅट घेऊन आला आणि यशस्वी जैस्वालने आपल्या चार बॅट्सपैकी एक निवडली. या अनोख्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, त्याच्या एका बॅटची किंमत १ लाख रुपये आहे. चाहत्यांनी या घटनेसंदर्भात विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीचे कौतुक केले, तर काहींनी जैस्वालच्या बचावात्मक फटक्याची प्रशंसा केली. या घटनेनंतरही यशस्वी जैस्वालने आपला डाव संयमाने पुढे नेला.
हेही वाचा – IND vs ENG : केएल राहुलचा इंग्लंडमध्ये खास पराक्रम, सचिन-विराटच्या यादीत मिळवलं स्थान
पहिल्या सत्राचा खेळ समाप्त –
भारतीय कसोटी संघासाठी तो एक महत्त्वाचा सलामी फलंदाज म्हणून उदयास आला आहे आणि आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सामन्याच्या पहिल्या सत्राबद्दल बोलायचे, तर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताने दुपारच्या जेवणापर्यंत एकही विकेट न गमावता ७८ धावा केल्या आहे. सध्या जैस्वाल ७४ चेंडूत ३६ धावा आणि राहुल ८२ चेंडूत ४० धावांवर खेळत आहे.





