‘यारिया’ फेम बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहली अडकला विवाहबंधनात

Himansh Kohli | बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीला ‘यारिया’ चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. नुकतेच हिमांश विवाहबंधनात अडकला आहे. मंगळवारी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दिल्लीतील एका मंदिरात थाटामाटात त्यांचा विवाह संपन्न झाला. हिमांशच्या लग्नाला त्याचे कुटुंबिय आणि मित्र-मैत्रीण उपस्थित होते. सध्या त्याचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हिमांशने गुलाबी रंगाची शेरवानी आणि त्याला साजेसा फेटा लग्नात परिधान केला होता. तर त्याची पत्नी विनीने गोल्डन आणि लाल रंगाची साडी परिधान केली होती. दोघेही या लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हिमांशच्या पत्नी विनीचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. Himansh Kohli |
दरम्यान, नेहा कक्कर आणि हिमांश कोहली त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत होते. नेहा आणि हिमांशने इंडियन आयडॉलच्या मंचावरही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले होते, परंतु अचानक असे काही घडले की त्यांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर नेहा कक्करने रोहनप्रीतसोबत लग्न केले. Himansh Kohli |
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हिमांश कोहलीने 2011 मध्ये टीव्ही शो ‘हमसे है लाइफ’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर, 2014 मध्ये त्याचा ‘यारिया’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला, जो एक हिट चित्रपट ठरला. पण यानंतर हिमांशचे ‘स्वीटी वेड्स एनआरआय’, ‘रांची एक्स्प्रेस’, ‘जीना इसी का नाम है’, ‘बुंदी रायता’, ‘गहवारा’, हे चित्रपट आले पण ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. तेव्हापासून हिमांश कोहली मोठ्या पडद्यापासून दूर आहे.
हेही वाचा:
मुंबईत मध्यरात्री जोरदार राडा; ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले





