Yami Gautam: यामी गौतम होणार ‘नई नवेली’ वधू; चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर
Yami Gautam: यामीच्या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Yami Gautam: अभिनेत्री यामी गौतम अलिकडेच ‘धुरंधर-२’ चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर आता यामीची आणखी एका नव्या चित्रपटात एन्ट्री होणार आहे. नुकतंच यामी गौतमच्या आगामी सिनेमाचं नवीन पोस्टर समोर आलं आहे. ‘नई नवेली’ असं या सिनेमाचं नाव असणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. बऱ्याच प्रतीक्षेनंतर यामीच्या या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. ‘नई नवेली’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी, म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट हॉरर असून यात कॉमेडीचा तडखा असणार आहे. ‘नई नवेली’ची कथा मेरठमधील एका कुटुंबावर आधारित आहे. या कुटुंबात एका नव्या नवरीची एन्ट्री होते आणि बघताच ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते. तिच्या उपस्थितीने घर आनंदाने भरून जाते आणि ती एक आदर्श सून असल्याचे दिसून येते. Yami Gautam
View this post on Instagram
पण जेव्हा तिच्या दीराला तिच्या वागण्यावर संशय येऊ लागतो आणि आदर्श दिसणारी वाहिनी प्रत्यक्षात एक डायन असू शकते, असे वाटते. तेव्हा कथेला वेगळं वळण येतं. दरम्यान, यामी गौतम आता पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असून, या चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाली आहे.
बालाजी मोहन दिग्दर्शित आणि हिमांशु शर्मा व दिव्य निधी शर्मा यांनी लिहिलेल्या या भव्य मनोरंजक चित्रपटात जी. व्ही. प्रकाश कुमार यांचे संगीत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना अशा दुनियेत घेऊन जातो, जिथे असामान्य घटना कौटुंबिक गोंधळ त्यातून अनपेक्षित वळणे व भरपूर हसू देणार आहे. ‘नई नवेली’ १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. Yami Gautam
हेही वाचा:
Pune Crime News: रक्ताचे डाग धुवून कॅफे पुन्हा सुरू; पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मालकासह दोघांना अटक





