यामी गौतम आणि इमरान हाश्मी एकत्र; अभिनेत्री दिसणार दमदार महिलेच्या भूमिकेत

Yami Gautam | बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम एका नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 1985 मध्ये सर्वोच्च न्यायालयात झालेल्या ऐतिहासिक शाह बानो विरुद्ध मोहम्मद अहमद खान खटल्यावर आधारित आहे. या खटल्याच्या 40 व्या वर्धापनदिनी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
यामी या चित्रपटात एका दमदार महिलेच्या रूपात दिसणार आहे, जी वैयक्तिक कायदा आणि संविधान यांच्यातील संघर्षात स्वतःसाठी न्याय मागते. वृत्तानुसार यामी गौतमच्या पतीच्या, म्हणजेच मोहम्मद अहमद खानच्या भूमिकेत इम्रान हाश्मी दिसणार आहे.
या खटल्यात अहमद खानने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक देऊन सोडले होते आणि नंतर निर्वाह भत्ता देण्यास नकार दिला होता. अहवालानुसार, चित्रपटाचे पहिले शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले असून, हा चित्रपट 1970 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर सेट करण्यात आला आहे. Yami Gautam |
इमरान हाश्मी यामीच्या पतीची भूमिका साकारत आहे, जो शाह बानोचा पती अहमद खानपासून प्रेरित आहे आणि प्रेक्षक या प्रकल्पातील प्रतिभावान कलाकारांकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करू शकतात. Yami Gautam |
यामी गौतमला नुकतेच ‘आर्टिकल 370’ चित्रपटात पाहिले गेले, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी कौतुक केले. दुसरीकडे, इम्रान हाश्मी सध्या आपल्या ‘ग्राउंड जीरो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये तो बीएसएफ अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, तो सलमान खानच्या ‘टायगर 3’ मध्येही दिसला आहे.
शाह बानो खटला
1978 मध्ये 62 वर्षीय शाह बानो यांना त्यांच्या पतीने तिहेरी तलाक दिला होता. त्यानंतर त्यांनी निर्वाह भत्त्यासाठी न्यायालयात धाव घेतली. 1985 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देताना सांगितले की, सीआरपीसीची कलम 125 सर्व धर्मांवर समानपणे लागू होते. हा निकाल महिलांच्या हक्कांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला होता.
हेही वाचा:
वाईकरांच्या सेवेत चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे सुवर्णदालन सुरू; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद





