शाओमी आणि ओप्पोला होऊ शकतो 1000 कोटींचा दंड – आयकर विभाग
Updated On:

नवी दिल्ली – शाओमी आणि ओप्पो या चिनी मोबाईल कंपन्यांनी कर कायद्यांचे उल्लंघन केले असून त्यांना 1000 कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो, असे आयकर विभागाने म्हटले आहे. 21 डिसेंबरला राजधानी दिल्लीसह, तमिळनाडू, असर, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, बिहार आणि राज्यस्थान अशा 11 राज्यांत या कंपन्यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले.
आयकर विभागाने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही प्रमुख कंपन्यांनी त्यांच्या आणि परदेशातील समूह कंपनींना रॉयल्टीच्या स्वरूपात 5500 कोटींहून अधिक रक्कम पाठवली आहे. या कंपन्यांनी आयकर कायदा 1961 अंतर्गत व्यवहार उघड करण्याच्या नियमाचे पालन केले नाही. अशा प्रकारची चूक त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार ठरते. त्यामुळे त्यांच्यावर एक हजार कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो.





