National doubles squash c’ship 2024 : जोश्ना, अभय व वेलवनची सुवर्ण कामगिरी…

National Doubles Squash Championship 2024 :- जोश्ना चिनप्पा, अभय सिंग आणि वेलवान सेंथिलकुमार (Joshna-Abhay-Velavan) यांनी बुधवारी येथे राष्ट्रीय दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये आपापल्या श्रेणींमध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.
तब्बल 17 वर्षांनंतर सुरु झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अभयने वेलवानसह राहुल बैथा आणि सूरज चंद यांचा 2-0 (11-4, 11-8) पराभव केला. त्यानंतर जोश्ना चिनप्पासह या 25 वर्षीय अभयने मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
अभय आणि जोश्ना यांनी हरिंदर पाल सिंग संधू आणि रथिका सीलन या जोडीचा 2-1 (10-11, 11-2, 11-9) असा पराभव केला. त्यानंतर पूजा आरती आणि रथिका यांनी जेनेट विधी आणि निरुपमा दुबे यांचे आव्हान 2-1 असे मोडून काढत महिला दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेतील विजेते 4 ते 6 जुलै दरम्यान जोहोर, मलेशिया येथे होणाऱ्या आशियाई स्क्वॉश दुहेरी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.





