WTC 2025 : पराभवानंतर पाकिस्तानला मोठा धक्का, ICC ने ठोठावला दंड; जाणून घ्या, कोणत्या चुकीसाठी मिळाली शिक्षा…

Pakistan WTC 2025 : रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने पाकिस्तानला दंड ठोठावला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच त्यांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही नुकसान सोसावे लागले आहे. पाकिस्तानला 6 गुण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानसोबतच बांगलादेशलाही दंड ठोठावण्यात आला आहे.
वास्तविक, रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. बांगलादेशने हा सामना 10 गडी राखून जिंकला. मात्र या सामन्यादरम्यान पाकिस्तानने निर्धारित वेळेत 6 षटके कमी टाकली. या कारणास्तव, त्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेतून 6 गुण वजा करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पाक संघ 16 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.
पाकिस्तानला मॅच फीच्या 30 टक्के दंड…
पाकिस्तानला यासोबतच मॅच फीच्या 30 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. बांगलादेशला मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद आणि बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो यांनी चूक मान्य केली आहे. याबाबतची माहिती आयसीसीने आपल्या वेबसाइटवर शेअर केली आहे.
IND vs PAK : भारत-पाकिस्तानमध्ये होणार WTC फायनल? जाणून घ्या, संपूर्ण समीकरण…
बांगलादेशचेही वजा झाले 3 गुण…
पाकिस्तानविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत बांगलादेशने चमकदार कामगिरी केली होती. मात्र, आयसीसीने बांगलादेशचे तीन गुण कापले आहेत. पाकिस्तानच्या डावात संघाने निर्धारित वेळेत 3 षटके कमी टाकली. याचा फटका त्यांना गुणतालिकेत बसला आहे. त्यामुळे बांगलादेशचा संघ आता 21 गुणांसह 6व्या स्थानावर आहे.





