मुंबई – मुंबई पोलिसांनी खासगी वाहनांवर पोलीस अथवा पोलिस चिन्हे वापरण्यास बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी हा आदेश जारी केला असून लवकरच राज्यातील इतर पोलीस आयुक्तालयात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे नातेवाईक अथवा पोलीस कर्मचारी नसलेली लोक आपल्या खासगी वाहनांवर सर्रास पोलिसांचा लोगो तसेच पोलीस नाव दिसून येतात. अशी वाहने आढळून आल्यास या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. पोलीसांच्या या नावाचा व लोगोचा वापर करून अनेक जण याचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी सुद्धा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसांनी खासगी वाहनांवर पोलीस अथवा पोलिस चिन्हे वापरण्यास मनाई केली आहे. असे दिसून आल्यास त्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. असे आदेश मुंबई पोलीसांनी काढले आहेत.