कुस्तीपटू विनेश फोगटने निवडणुक लढवण्याबाबत पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका, जाणून घ्या –

चंदीगढ – भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट भारतात परत आल्यापासून ती राजकारणा सक्रीय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तिने आतापर्यंत या विषयावर मौन धारण केले होते. मात्र शनिवारी ती शंभू बॉर्डरवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी तेथे गेली. यावेळी तिला विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर निवडणुकांशी आपल्याला काही देणेघेणे नसल्याचे तिने स्पष्ट केले.
कॉंग्रेसकडून तुम्हाला तिकिट मिळाले तर तुम्ही हरियाणाची निवडणूक लढवणार का असा प्रश्न विनेशला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना ती म्हणाली मी निवडणुकीच्या संदर्भात काही बोलणार नाही. मी राजकारणाविषयीही काही बोलणार नाही. मी आपल्या कुटुंबाकडे परत आली आहे. तुम्ही या विषयावर बोलाल तर याचा संघर्ष आणि लढा वाया घालवत आहात. आज फोकस माझ्यावर नाही आहे.
विनेश पुढे म्हणाले की मी तुम्हाला आवाहन करते. मी खेळाडू आहे, मी संपूर्ण देशाची आहे. कोणत्या एका राज्यात निवडणूक होत असेल तर त्यामुळे मला काही फरक पडत नाही. मला फक्त एवढेच समजते की आज देशातील शेतकरी अडचणीत आहे. सरकारने त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत. त्यालाच सरकारचे प्राधान्य असले पाहिजे.
कोणीही अपरिहार्यतेमुळेच आंदोलन करत असतो. जेंव्हा आंदोलन प्रदीर्घ काळ चालते तेंव्हा लोकांच्या मनात आशा जागृत होतात. जर आपलेच लोक रस्त्यांवर बसलेले असतील तर देशाची प्रगती कशी होईल? मला वाटते आपल्या हक्कांसाठी लोकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे.





