WPL 2024 ( #GGvDC Match 10 ) : गुजरातचा दिल्लीविरुद्ध गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघात मोठे बदल, जाणून घ्या Playing 11…

WPL Live Cricket Score, GG vs DC Women’s Premier League 2024 : आज एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा दहावा सामना खेळला जात आहे.
गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने दोन बदलांसह या सामन्यात प्रवेश केला आहे. हरलीन देओल आणि स्नेह राणा दिल्लीविरुद्ध खेळताना दिसणार नाहीत. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग म्हणाली की, आज मारिजन कॅप आणि मिन्नू मणी प्लेइंग 11 चा भाग असणार नाहीत.
Here’s how the two sides look for the #GGvDC clash 👌👌
Live 💻📱https://t.co/9MIuaZmvo8#TATAWPL pic.twitter.com/Ax8WZzlbTn
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 3, 2024
GG vs DC : दोन्ही संघाची प्लेइंग 11 –
गुजरात जायंट्स : लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (wk/c), फोबी लिचफिल्ड, ऍशले गार्डनर, वेदा कृष्णमूर्ती, दयालन हेमलता, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, मेघना सिंग, मन्नत कश्यप, तरन्नुम पठाण.
दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), तीतास साधू, राधा यादव, शिखा पांडे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/wpl-2024-why-did-mumbai-captain-harmanpreet-not-play-first-against-up-and-then-against-rcb-know-the-reason/
दरम्यान, पहिल्या विजयाच्या शोधात गुजरात आज दिल्लीविरुद्ध दमदार कामगिरी करताना दिसेल. गुजरातला मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्सकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.





