WPL 2024 ( #DCvRCB Match 17 ) : जेमिमाची तुफानी अर्धशतकी खेळी, दिल्लीचं बंगळुरुसमोर विजयासाठी मोठं लक्ष्य…

WPL Live Cricket Score, DC vs RCB Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीगचा 17 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून आरसीबीविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 181 धावा केल्या असून आरसीबीसमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान ठेवलं आहे.
यादरम्यान जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक 58 धावा केल्या. मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी झाली. शेफाली वर्मा 23 धावा करून बाद झाली. आशा शोभनाने तिचा बळी घेतला. आठव्या षटकात श्रेयंका पाटीलने संघाला दुसरा धक्का दिला. श्रेयंकाने मेग लॅनिंगला एलबीडब्ल्यू आऊट केले. कर्णधारा लॅनिंगने पाच चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या.
संघाला तिसरा धक्का जेमिमाह रॉड्रिग्जच्या रूपाने बसला. तिने एलिस कॅप्सीसोबत 97 धावांची भागीदारी केली. मात्र, श्रेयंका पाटीलने तिलाही बाद केले. त्याच वेळी, एलिस कॅप्सीही 32 चेंडूत 48 धावा करून बाद झाली, तिलाही श्रेयंकाने बळी बनवले. आरसीबीची घातक गोलंदाज श्रेयंका पाटीलने जेस जोनासनला बाद करत पाचवा धक्का दिला. ही तिची चौथी विकेट होती. जेस जोनासनला एकच धाव करता आली. आरसीबीविरुद्ध मारिजने कॅपने 12 धावा आणि राधा यादवने 1 धावा केल्या, दोघीही नाबाद राहिल्या.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/cricket-and-politics-before-yusuf-pathan-these-cricketers-including-sachin-tendulkar-played-political-innings-some-got-clean-bowled-and-some-raised-flags/
मंधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाकडून श्रेयंका पाटीलने सर्वाधिक चार बळी घेतले. तिने 4 षटकात 26 धावा दिल्या. त्याचवेळी आशा शोभना हिने 4 षटकात 29 धावा देत एक गडी बाद केला.





