WPL 2024 ( #DCvGG Match 20 ) : गुजरातवर विजय मिळवत दिल्लीनं गाठली अंतिम फेरी…

WPL Live Cricket Score, DC vs GG Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीग 2024 चा शेवटचा लीग सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा सात गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गेल्या मोसमातही मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघ अंतिम सामना खेळला होता. मात्र, मुंबईकडून संघाचा दारुण पराभव झाला होता.
बुधवारी झालेल्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 126 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 13.1 षटकांत तीन गडी गमावून 129 धावा केल्या आणि सामना सात विकेटने जिंकला. शेफाली वर्मा सामन्याची मानकरी ठरली. आता या स्पर्धेतील एलिमिनेटर सामना मुंबई आणि आरसीबी यांच्यात 15 मार्च रोजी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ दुसऱ्या सत्राचा अंतिम सामना 17 मार्च रोजी दिल्लीविरुद्ध खेळेल.
गुजरातविरुद्ध दिल्लीने दमदार सुरुवात केली. कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी झाली. लॅनिंग 10 चेंडूत 18 धावा करून बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली ॲलिस कॅप्सी शून्यावर बाद झाली. तनुजा कंवरने तिला आपली शिकार बनवले.
Sensational Shafali👌👌
For her stunning match-winning knock, Shafali Verma bags the Player of the Match award 🏆
Scorecard 💻📱https://t.co/qXiPrN2sAj#TATAWPL | #DCvGG pic.twitter.com/EJrbCIvGVI
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 13, 2024
त्यानंतर शफालीने मात्र, गुजरातच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. तिने जेमिमा रॉड्रीक्ससह संघाचे अर्धशतक फलकावर लावले. तिने जेमिमाच्या साथीत गुजरातच्या प्रत्येक गोलंदाजावर दडपण राखले. शफाली व जेमिमा दोघीही आक्रमक फलंदाजी करत होत्या. शफालीने अर्धशतक पूर्ण केल्यावर धावांचा वेग वाढवला. मात्र, विजयासाठी 2 धावांची गरज असताना ती 71 धावांवर बाद झाली. तिने 37 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली. जेमिमा आणि शफालीमध्ये 94 धावांचा भागिदारी झाली. जेमिमाने नाबाद 38 धावा करताना 28 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावला. गुजरातकडून गोलंदाजीत तनुजा कंवरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, गुजरातची कर्णधार बेथ मूनीने नाणेफेक जिंकून दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुजरातने 20 षटकांत नऊ गडी गमावून 126 धावा केल्या.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/wpl-2024-dcvgg-match-20-delhicapitals-restrict-gujarat-giants-to-126-runs/
महिला प्रीमियर लीगच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सविरुद्ध घातक गोलंदाजी केली त्यामुळे बेथ मुनीच्या नेतृत्वाखालील संघाला 126 धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात गुजरात संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. फलंदाजीला सुरुवात करण्यासाठी आलेली कर्णधार खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतली. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली दयालन हेमलताला केवळ चार धावा करता आल्या. गुजरातला तिसरा धक्का लॉरा वोल्वार्डच्या रूपाने बसला, जिला केवळ सात धावा करता आल्या.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ranji-trophy-2023-24-final-day-4-stumps-vidarbha-batsmen-dominate-on-day-4-mumbais-victory-overdue/
या सामन्यात भारती फुलमाळी व्यतिरिक्त संघाच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. तिने 36 चेंडूत 42 धावांची खेळी खेळली. या काळात तिच्या बॅटमधून सात चौकार आले. तिच्याशिवाय कॅथरीन ब्राईसने नाबाद 28 धावा, फोबी लिचफिल्डने 21 धावा, ऍशले गार्डनरने 12 धावांची खेळी केली. तनुजा कंवर शून्य तर शबनम शकील 1 धाव काढून बाद झाली. मन्नत कश्यप एकही धाव न काढता नाबाद राहिली.
मॅरिझान कॅप, शिखा पांडे आणि मिन्नू मणी यांनी दिल्लीसाठी घातक गोलंदाजी केली. तिघींनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याच वेळी जेस जोनासनला 1 यश मिळाले.





