चिंताजनक.! ग्रामीण भागात करोनाचे थैमान, वाढत्या आकड्यांमुळे काळजात धस्स
Updated On:

पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. मागील दहा दिवसांपासून करोनामुक्तांची संख्याही वाढत आहे. ग्रामीणमधील सध्याचा बाधित दर 12 ते 13 टक्के असला, तरी करोनामुक्तीचे प्रमाण हे 90 टक्क्यांवर आहे.
मेच्या सुरुवातीपासून शहरातील बाधित संख्या उतरण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी ग्रामीण भागात ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एप्रिलच्या सुरुवातीला एक ते दीड हजारांवर असलेली बाधित संख्या तब्बल 4 हजारांवर पोहचली.
मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली. त्यामुळे प्रशासनाने आता घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यातून नवे बाधित आढळत आहेत.




