World Olympic Qualifying Tournament 2024 (Boxing) : भारताच्या निशांत देवची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

World Olympic Boxing Qualification Tournament 2024 (इटली) – वर्ल्ड चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता निशांत देवने शुक्रवारी इटलीच्या बुस्टो अर्सिझियो येथे पहिल्या जागतिक बॉक्सिंग पात्रता (पॅरिस ऑलिम्पिक 2024 ) स्पर्धेत जॉर्जियाच्या एस्करखान मादियेववर क्लिनिकल विजय मिळवून राउंड ऑफ 16 (उपांत्यपूर्व फेरी) मध्ये प्रवेश केला.
पुरुषांच्या 71 किलो वजनी गटात भारतीय बॉक्सर निशांतने टोकियो ऑलिम्पियन एस्कारखान मादियेवचा 5-0 असा पराभव करून राउंड ऑफ 32 मध्ये विजय मिळवला. राउंड ऑफ 64 च्या फेरीत, देवने कॉमनवेल्थ गेम्सच्या कांस्यपदक विजेत्या ग्रेट ब्रिटनच्या लुईस रिचर्डसनचा 3-1 ने पराभव केला होता.
निशांत आता रविवारी राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात खेळणार आहे. एकूण नऊ भारतीय बॉक्सर्सने बुस्टो अर्सिझियो मीटमध्ये भाग घेतला, त्यापैकी फक्त निशांत देव आणि जागतिक चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता मोहम्मद हुसमुद्दीन याचे स्पर्धेत आव्हान कायम आहे.
हुसामुद्दीनला पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या पहिल्या फेरीत बाय मिळाला आणि आता राऊंड ऑफ 32 च्या फेरीत त्याचा सामना गत सीडब्लूजी (CWG) चॅम्पियन आयर्लंडच्या ज्यूड गॅलाघरशी होईल.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/uefa-champions-league-2023-24-manchester-city-in-the-quarter-finals-for-the-seventh-time-in-a-row/
दरम्यान, आतापर्यंत, भारताने बॉक्सिंगमध्ये चार पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवले आहेत, ज्यात महिला बॉक्सर निखत जरीन (50 किलो), प्रीती पवार (54 किलो), परवीन हुडा (57 किलो) आणि लोव्हलिना बोरगोहेन (75 किलो) यांचा समावेश आहे. ज्यानी गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत हा कोटा गाठला होता. पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रत्येक देश जास्तीत जास्त एक वजन श्रेणीसाठी पात्र ठरू शकतो. या स्पर्धेतील ऑलिम्पिक कोट्यापासून वंचित राहिलेले बॉक्सर्स २३ मे ते ३ जून दरम्यान बँकॉक (थायलंड) येथे होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळतील.





